अमित भानुशाली, ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुनच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता आहे. हिंदीत अनेक भूमिका साकारल्यानंतरही त्याला हवी तशी ओळख मिळाली नव्हती. मात्र, ‘ठरलं तर मग’ मालिकेने त्याला घराघरात पोहोचवलं. अमितने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, या मालिकेने त्याला नाव आणि फेम दिलं. प्रेक्षकांना त्याची आणि जुई गडकरीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप आवडते.