बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारियाने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’मधून पदार्पण केलं. तिने सांगितलं की, इंडस्ट्रीत नवीन असताना तिला खूप एकटेपण जाणवलं आणि कामाच्या पद्धतींची सवय व्हायला वेळ लागला. तिला इंडस्ट्रीतील लोकांबद्दल फारशी माहिती नव्हती, त्यामुळे मार्गदर्शनाची गरज होती. तारा ‘मरजावान’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’, ‘अपूर्वा’ यांसारख्या चित्रपटांत आणि वेब सीरिजमध्ये झळकली आहे.