Maharashtra Budget Session 2024 , 28 February 2024 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवशेनाचा आज तिसरा दिवस आहे. आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी यांचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून सरकारच्या मागच्या दीड वर्षांतील कामांची उजळणी केली जाईल तर विरोधक शेतकऱ्यांचे प्रश्न, गारपीट, दुष्काळाची परिस्थिती याकडे सरकारचे लक्ष वेधतील. दरम्यान आज सायंकाळी यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होत असून ते या सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करतील. त्यामुळे सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ या सभेला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जाते. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

sankarshan karhade share experience to visit raj thackeray home
“राज साहेबांनी घरी बोलावलं, ठाकरे-पवारांचा फोन आला अन्…”, संकर्षण कऱ्हाडेच्या ‘त्या’ राजकीय कवितेनंतर काय घडलं? म्हणाला…
nilesh sable recalls meeting raj thackeray
निलेश साबळेने सांगितला राज ठाकरेंच्या घरी घडलेला ‘तो’ किस्सा; म्हणाला, “माझ्या कोणत्याही मिमिक्रीवर…”
salman khan galaxy apartment firing case
“सलमानला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार”, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “दोन्ही आरोपी…”
Taapsee Pannu broke silence on secret wedding with Mathias Boe
बॉयफ्रेंडशी गुपचूप लग्न करण्याबाबत तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “माझा जोडीदार…”
Live Updates

Mumbai Maharashtra News Updates

19:25 (IST) 28 Feb 2024
"यूपीएचे कृषीमंत्री दिल्लीत पॅकेज घोषित करायचे, परंतु ते पैसे...", यवतमाळमधून मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

किसान सन्मान निधीचं वाटप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, एनडीए सरकारच्या काळात देशात मोठा विकास झाला आहे. परंतु, याआधीच्या सरकारच्या काळात काय होत होतं ते एकदा आठवून पाहा. आज जी इंडी आघाडी तयार झाली आहे, यांचंच याआधी केंद्रात सरकार होतं. तेव्हा देशाची स्थिती काय होती ते आठवून पाहा. तेव्हाचे कृषीमंत्रीदेखील या महाराष्ट्राचे होते. त्या वेळी दिल्लीमधून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावाने पॅकेज घोषित केलं जायचं. परंतु, ते पॅकेज मध्येच लुटलं जात होतं.

18:39 (IST) 28 Feb 2024
मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….

पिंपरी : समाजमाध्यमातील ‘इंस्टाग्राम’वरून मैत्री झालेल्या तरुणीने तरुणाला संदेश करून भेटायला बोलाविले आणि….

सविस्तर वाचा

18:37 (IST) 28 Feb 2024
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात भाजयुमोचे राष्ट्रीय अधिवेशन, जे पी नड्डांसह भाजपचे मोठे नेते येणार

नागपूर : भारतीय जनता पक्षाची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ४ मार्चला नागपुरात आयोजित करण्यात आले असून त्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.

सविस्तर वाचा...

18:36 (IST) 28 Feb 2024
आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाजाने निवडणुका लढवाव्या; प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडविण्याऐवजी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केले जात आहेत. मराठा समाजाचे आंदोलन दडपले जाऊ नये, यासाठी निवडणूक लढविली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला.

सविस्तर वाचा...

18:34 (IST) 28 Feb 2024
बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?

छत्रपती संभाजीनगर : धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील लिंगायत मतांवर प्रभाव असणाऱ्या बसवराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसवर कितपत प्रभाव पडणार याची आता चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा...

18:34 (IST) 28 Feb 2024
चंद्रपूर : पोटासाठी बंद खाणीतून कोळसा काढताना मृत्यू, ढिगाराच अंगावर कोसळला

चंद्रपूर: भद्रावती तालुक्यातील तेलवासा येशील बंद असलेल्या कोळसा खाणीतून विक्रीसाठी कोळसा काढत असताना ढिगाऱ्याखाली दबून एका चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. रवींद्र पाटील (४०) रा. पिपरी देशमुख असे या मृत इसमाचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

18:34 (IST) 28 Feb 2024
कल्याण डोंबिवली पालिका नगररचनेतील दोन कर्मचारी निलंबित

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल यांना प्रशासनाने बुधवारी पालिका सेवेतून निलंबित केले.

सविस्तर वाचा...

18:27 (IST) 28 Feb 2024
महाराष्ट्रात इस बार ४५ पार - मुख्यमंत्र्यांचा यवतमाळमध्ये नारा!

मोदींच्या नेतृत्वात 'एनडीए इसबार ४०० पर और महाराष्ट्र में महायुती ४५ पार' हा आमचा निर्धार आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

18:19 (IST) 28 Feb 2024
यवतमाळमधील सभेत देवेंद्र फडणवीसांची मोदींवर स्तुतीसुमनं

राज्य सरकारने लेक लाडकी, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत अशा अनेक योजना सुरू केल्या. या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा आपण प्रयत्न करत आहोत. मोदी म्हणाले की फक्त चारच जाती आहेत. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब. या चारही जातींना समर्पित आजचा कार्यक्रम आहे. कारण आज शेतकरी सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजना मिळून ४ हजार ७०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहेत. आज मोदी आवास योजनेची सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, भटके विमिक्त १० लाख कुटुंबांना या योजनेअंतर्गत स्वत:चं घर दिलं जाणार आहे. नारी शक्ती वंदना असल्यामुळे आम्ही प्रयत्न करणार आहोत की त्या प्रत्येक घरात घराच्या पुरुषासोबत महिलेचं नाव मालकी हक्कात असलंच पाहिजे. कारण मोदी आवास असेल तर महिलांना ते मिळालंच पाहिजे असा प्रयत्न आम्ही करणार आहोत - देवेंद्र फडणवीस</p>

17:43 (IST) 28 Feb 2024
ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, कारवाईची मागणी

सांगली : चिथावणीखोर वक्तव्य करून राज्यातील ब्राम्हण समाजाच्या हत्याकांडाची धमकी दिल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरोधात बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. समाज माध्यमावरील एका वाहिनीवरून अज्ञाताने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सांगली शाखा व ब्राम्हण सभा यांच्यावतीने बुधवारी ही तक्रार देण्यात आली आहे.

तथाकथित गावरान विश्लेषक या चॅनलवर मराठा आरक्षण आंदोलनातील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. सदर चित्रफितीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने अख्या ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू अशी जाहीर धमकी दिली. त्याबरोबरच त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एकेरी शब्दात असभ्य भाषेत टीका केली. या वादग्रस्त चित्रफितीमुळे ब्राह्मण समाजामध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

17:25 (IST) 28 Feb 2024
अमरावती : लष्करात सेवा बजावून सुटीवर घरी आला आणि अपघातात गेला….

अमरावती : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्‍याने झालेल्‍या अपघातात दुचाकीवरील सैनिकाचा जागीच मृत्यू झाला. एक जखमी झाला. हा अपघात बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव चौक परिसरात घडला. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा...

17:00 (IST) 28 Feb 2024
कडोंमपा नगररचना कर्मचारी अटक प्रकरणात पोलिसांकडून भूमि अभिलेख कार्यालयातील अभिलेखांची तपासणी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या अटकेनंतर या प्रकरणाशी येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा काही सहभाग आहे का. डोंबिवलीतील विकासक विनोद किसन म्हात्रे यांनी पालिका नगररचना विभागात दाखल केलेल्या इमारत आराखडा प्रस्तावात भूमिअभिलेख विभागाचा बनावट नकाशा, तेथील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या, शिक्के यांचा सहभाग आढळून आला आहे.

वाचा सविस्तर...

16:59 (IST) 28 Feb 2024
मत्स्यसंवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर १२१ कृत्रिम भित्तिकांची उभारणी

अलिबाग : वारेमाप मासेमारीमुळे भारतीय किनाऱ्यावर आढळणाऱ्या ६५ पैकी ३५ मत्स्यप्रजाती संकटात सापडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन, मत्स्य संवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर समुद्रात १२१ ठिकाणी कृत्रिम भिंत्तिकांची उभारणी केली जाणार आहे. समुद्राच्या तळाशी शास्त्रोक्त पध्दतीने या भित्तिका उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

16:33 (IST) 28 Feb 2024
वसईकरांना पालिकेतून ५१ सेवा मिळणार ऑनलाईन; वेळेची बचत आणि कामात पारदर्शकपणा

वसई- वसई विरार मधील नागरिकांना यापुढे विविध दाखले तसेच परवाने घेण्यास पालिकेत जाण्याची गरज पडणार नाही. पालिकेने एकूण ५१ सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी सेवा हमी कायदा (राईट टू सर्व्हिस) संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

सविस्तर वाचा

16:15 (IST) 28 Feb 2024
वसई भाईंदर रोरो सेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद; प्रवासी कर माफ केल्याने वर्षभर वाजवी दरात सेवा

वसई- वसई- भाईंदर रोरो सेवेला आठवडा पूर्ण झाला असून नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना या रोरो सेवेचा अधिकाअधिक लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रवासी कर पुढील एक वर्षासाठी माफ केला आहे. त्यामुळे वाजवी दरात नागरिकांना रोरो सेवेचा आनंद घेता येणार आहे.

सविस्तर वाचा

16:14 (IST) 28 Feb 2024
पुणे : अरबी भाषेत संवाद साधून आखाती देशातील नागरिकांना लुटणारी दिल्लीतील टोळी गजाआड

पुणे : पुण्यात वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या आखाती देशातील नागरिकांना लुटणाऱ्या दिल्लीतील चोरट्यांना पोलिसांनी पकडले. अटक करण्यात आलेली चोरटे इराणी टोळीतील असून, ते अरबी भाषेत आखाती देशातील नागरिकांशी संवाद साधत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा...

15:49 (IST) 28 Feb 2024
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…

नागपूर : भारत सरकारद्वारे देशभरात विमानसेवेचे जाळे विणण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून छोट्या विमानसेवेद्वारे लहान शहरात ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवणाऱ्यावर भर दिला जात आहे. परंतु, महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीमध्ये प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत कैकपटीने वाढूनदेखील येथे विमानांची संख्या आणि नवीन विमान कंपन्यांची सेवा वाढवण्यात येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, एका कंपनीची मक्तेदारी निर्माण होत आहे.

सविस्तर वाचा...

15:30 (IST) 28 Feb 2024
सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार

कोल्हापूर: इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकूड पाणी योजनेचे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व समाज कल्याण मंत्री सुरेश खाडे खाडे यांना रविवारी, सोमवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवण्यात येणार असून त्यांच्यासमोर निदर्शने केली जाणार आहेत. असा निर्णय आज सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

वाचा सविस्तर...

15:25 (IST) 28 Feb 2024
अकोला : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उंदराचे शेपूट! दहा विद्यार्थ्यांना विषबाधा

अकोला : महापालिकेच्या शाळेतील पोषण आहारामध्ये चक्क उंदराचे शेपूट आढळल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे. या प्रकारामुळे सुमारे दहा विद्यार्थ्यांना विषबाधा सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

सविस्तर वाचा...

15:23 (IST) 28 Feb 2024
सावधान! शेयर मार्केटमधून नफ्याचे आमिष; वृद्ध डॉक्टरची ६४.५० लाखांनी फसवणूक

अकोला : शेयर मार्केटमधून पाच ते दहा हजार नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका वयोवृद्ध डॉक्टरची तब्बल ६४.५० लाख रुपयांनी ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला.

सविस्तर वाचा...

14:30 (IST) 28 Feb 2024
गडचिरोली : ‘एमआयडीसी’ भूसंपादनप्रकरणी शेतकरी आक्रमक; जमीन मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठवले

गडचिरोली : जिल्ह्यात प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाने नोटीस काढली आहे. त्याकरिता मंगळवारी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन जमीन मोजणीसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी परतून लावल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुधोलीचक क्र. १ या गावातील ही घटना असून नागरिकांचा उद्योगासाठी जमीन देण्यास विरोध आहे.

सविस्तर वाचा...

14:18 (IST) 28 Feb 2024
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

नवी मुंबई : शहरात अनेक ठिकाणच्या पदपथांवर पथदिव्यांच्या वायरी तसेच विविध ठिकाणी ऑप्टीकल फायबर टाकल्यानंतरचे वेटोळे तसेच उघड्यावर पडलेले दिसत असल्याने पादचाऱ्यांना चालताना अडचणी येतात. वीजप्रवाह सुरू राहिल्याने विजेचा धक्का लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या असल्या तरी महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

सविस्तर वाचा

14:18 (IST) 28 Feb 2024
कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती

कल्याण - कल्याण डोंबिवली पालिका परिसरात एकत्रित परिवहन प्राधिकरण मंंडळाच्या माध्यमातून बस सेवा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांना दिली.

सविस्तर वाचा

14:11 (IST) 28 Feb 2024
आंतरराष्ट्रीय पक्षीगणना ! वर्धा जिल्हा नोंदणीत अग्रेसर, आढळले ‘हे’ पक्षी

वर्धा : आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी पक्षीगणना होते. ती ग्रेट बँकयार्ड बर्ड काउन्ट म्हणून ओळखल्या जात असते. त्याचे औचित्य साधून पक्षी निरीक्षकांनी मोहीम राबविली होती. देशातील ३७ राज्यांनी त्यात भाग घेतला. ३८९ पक्षी प्रजातीसह महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आला. तर राज्यात वर्धा जिल्हा १३ व्या स्थानावर आहे.

सविस्तर वाचा...

14:01 (IST) 28 Feb 2024
पुणे : दांडेकर पूल, बिंदू माधव ठाकरे चौकात होणार ग्रेड सेपरेटर – उड्डाणपूल

पुणे : सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल आणि संगमवाडी यथील बिंदूमाधव ठाकरे चौकात ग्रेड सेपटरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याच्या अनुषंगाने सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

13:22 (IST) 28 Feb 2024
जळगाव जिल्ह्यात लाचखोर विद्युत निरीक्षक जाळ्यात

जळगाव : परवाना नूतनीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या जळगाव जिल्ह्यातील उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील विद्युत निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.

सविस्तर वाचा...

13:04 (IST) 28 Feb 2024
नागपूर शहरात पुन्हा वाढला पिस्तुलांचा वापर

नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून शहरात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा वापर वाढला असून दर आठवड्यात आरोपींकडे पिस्तूल सापडल्याचे गुन्हे दाखल होत आहे. अशाच प्रकारे सोमवारीसुद्धा संशयावरून पकडलेल्या एका आरोपीच्या खिशातूनच चक्क पिस्तूल निघाल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

सविस्तर वाचा...

12:58 (IST) 28 Feb 2024
मुंबईतील तापमानाचा पारा आज, उद्या ३७ अंशावर

मुंबई : मागील काही दिवस कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असून पहाटे गारवा त्यानंतर दिवसभर उकाडा अशा वातावरणाचा मुंबईकरांना सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाचा सविस्तर...

12:55 (IST) 28 Feb 2024
पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ सभेसाठी १२ कोटींचा खर्च, जनतेच्या पैशांतून उधळपट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर असून त्यांची आज सभा होत आहेत. या सभेसाठी ४३ एकर जमिनीवर मंडप उभारण्यात आला आहे. दोन लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या अतिभव्य सभेसाठी १२ कोटी ७३ लाखांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जनतेच्या पैशातूनही अधळपट्टी कशासाठीही अशी टीका काँग्रेसने केली आहे.

https://twitter.com/INCMaharashtra/status/1762738548216566077

12:54 (IST) 28 Feb 2024
नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

मुंबई : शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. २०२२-२३ वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

वाचा सविस्तर...

12:54 (IST) 28 Feb 2024
पुणे : लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा

पुणे : संगमवाडी येथे महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या आद्यक्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

12:53 (IST) 28 Feb 2024
नाशिकमध्ये आंदोलक आदिवासी शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेश रोखला, सीबीएस चौकात ठिय्या

नाशिक : राज्य सरकारशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर बुधवारी आदिवासी शेतकरी, शेतमजुरांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयाची घेराबंदी अधिक भक्कम करत अधिकारी आणि नागरिकांचा प्रवेश रोखला. यामुळे या कार्यालयात प्रवेश करणे अवघड झाले.

सविस्तर वाचा...

12:53 (IST) 28 Feb 2024
वाहन चालकाची दादागिरी… अन् महामार्गावर तीन तास कोंडी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी येथील सोनाळे भागात बुधवारी टँकरचा कारला धक्का लागल्याने कार चालकाने तो टँकर भर रस्त्यात अडवून टँकरची किल्ली काढली. त्यानंतर तो कार चालक किल्ली घेऊन निघून गेला. या प्रकारामुळे टँकर रस्त्याच्या मध्येच उभा होता. त्यामुळे महामार्गावर तीन तास कोंडी झाली. याप्रकरणाची ठाणे ग्रामीण पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून टँकर चालकाच्या तक्रारीनंतर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

12:50 (IST) 28 Feb 2024
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड

नागपूर : पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरले आहे. त्यांनी चक्क एका कुख्यात गुंडाला पकडले.

सविस्तर वाचा...

12:33 (IST) 28 Feb 2024
मुंबई : खुल्या निविदेद्वारे अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास

मुंबई : काळा चौकी येथील अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास ‘कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सी’मार्फत करण्याच्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अभ्युदय नगरसह आदर्श नगर (वरळी) आणि वांद्रे रेक्लमेशन वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा एकत्रित प्रस्ताव म्हाडाने सादर केला होता. मात्र त्याऐवजी फक्त अभ्युदय नगर वसाहतीच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

12:24 (IST) 28 Feb 2024
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : राज्यातील ८८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रत्येकी सहा हजार रुपये

पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी चार हजार, असे एकूण प्रति शेतकरी सहा हजार रुपये आज, बुधवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.

सविस्तर वाचा...

12:21 (IST) 28 Feb 2024
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित

नगरः महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील जागावाटप अद्याप जाहीर झाले नसले तरी नगरमध्ये उभय बाजूंनी निवडणुकीची पूर्वतयारी जय्यत सुरु आहे. दोन्ही बाजूंच्या घटक पक्षांत संघटीतपणा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत त्याचा अभाव अधीक दिसतो, असेच सध्याचे नगर जिल्ह्यातील चित्र आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीचे नगर जिल्ह्यातील चित्र एकत्रितपणाचे नाही, हेच ठळकपणे समोर येत आहे.

सविस्तर वाचा...

12:01 (IST) 28 Feb 2024
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

नागपूर : कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस तर ५ मार्चपासून बेमुदत कामबंदची हाक दिली आहे. कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार संघटना व तिन्ही कंपन्यांची सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ वा. पासून कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत.

सविस्तर वाचा...

12:01 (IST) 28 Feb 2024
पुणे : स्वदेशी ‘जीएमआरटी’चा ३८ देशातील शास्त्रज्ञांकडून वापर

पुणे : संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानातून उभारलेल्या ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) या महाकाय रेडिओ दुर्बिणीचा जगातील ३८ देशांतील शास्त्रज्ञांकडून संशोधनासाठी वापर केला जात आहे.

सविस्तर वाचा...

12:00 (IST) 28 Feb 2024
धुळे : अधिकाऱ्यांच्या तोंडी परीक्षेत मुख्याध्यापकच नापास, मग…

धुळे : विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता न येणे, यात काहीही विशेष नाही. परंतु, धुळे जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी घेतलेल्या तोंडी परीक्षेत जेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकालाच कोणतेही उत्तर देता आले नाही, तेव्हा सर्वच चकित झाले. त्यामुळे शेवटी जे व्हायचे तेच झाले.

सविस्तर वाचा...

11:59 (IST) 28 Feb 2024
पिंपरी : महापालिकेत ५६ तरुणांना नोकरी मिळाली; पण ते कामावर रुजू होईनात… काय आहे कारण?

पिंपरी : शासकीय किंवा महापालिकेची नोकरी मिळविणे तरुण-तरुणीचे स्वप्न असते. लिपिक पदाच्या परीक्षेत १८० जण उत्तीर्ण होऊनही आत्तापर्यंत १२४ जणांनी महापालिकेची नोकरी स्वीकारली आहे. तर, ५६ जणांनी अद्याप नोकरी स्वीकारलेली नाही.

सविस्तर वाचा...

11:58 (IST) 28 Feb 2024
नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी

नागपूर: नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील १२५ रिक्त पदे ऑनलाईन परीक्षेद्वारे भरण्यासाठी टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

11:55 (IST) 28 Feb 2024
ठाणे स्थानकातील पादचारी पुलांवर गर्दीचा महापूर

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तुलनेत पादचारी पुल तुलनेने कमी असल्याने आता पादचारी पुलांवर प्रवाशांच्या गर्दीचा कडेलोट होत आहे. दररोज प्रवाशांची एकमेकांसोबत रेटारेटी होत असल्याने अनेकदा प्रवाशांचे एकमेकांसोबत वादाचे प्रसंग उद्भवत आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील घटनेची पुनरावृत्ती होते का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

वाचा सविस्तर...

11:54 (IST) 28 Feb 2024
ठाणे : कोट्यवधी रुपयांचे ‘हॅश’ तेल जप्त, चार जणांना अटक

ठाणे : ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने चरस या अमली पदार्थांपासून तयार केले जाणार हॅश तेल विक्री करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. अभिजीत भोईर (२९), पराग रेवंडकर (३१), सुरेंद्र अहिरे (५४) आणि राजु जाधव (४०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा हॅश तेल जप्त केला आहे.

वाचा सविस्तर...

11:27 (IST) 28 Feb 2024
पुणे : सासवड परिसरात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड

पुणे : सासवड परिसरातील कोडित गावात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा...

11:21 (IST) 28 Feb 2024
पुणे :‘मेफेड्रोन’ प्रकरणात पश्चिम बंगालमधून एकजण ताब्यात

पुणे : मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमधील मालदा येथून एकाला ताब्यात घेतले. अमली पदार्थ तस्कर संदीप धुनिया याच्या संपर्कात पश्चिम बंगालमधील संशयित आरोपी असल्याचे आढळून आले आहे. सुनील बर्मन असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

11:19 (IST) 28 Feb 2024
Leap Year 2024 : २९ फेब्रुवारी लीप इयर निमित्त काही वैज्ञानिक माहिती; लीप इयर बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

Leap Year 2024 : २९ फेब्रुवारी २०२४ हे लीप वर्ष आहे. कारण या वर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस असतील. दर ४ वर्षांनी हा दिवस येतो. २०२४ हे वर्ष ३६५ ऐवजी ३६६ दिवसांचे आहे अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

सविस्तर वाचा...

10:58 (IST) 28 Feb 2024
शीव कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी

मुंबई : शीव कोळीवाडा, जीटीबी नगर येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मोतीलालनगर पुनर्विकासाच्या धर्तीवर म्हाडाच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

10:56 (IST) 28 Feb 2024
लोकजागर : पाणीकपात करा…

पुण्यातील सर्वपक्षीय राजकारणी भित्रट आहेत. याचे कारण शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याची त्यांना भीती वाटते. पाणीकपात केली, तर मतदार नाराज होतील आणि त्याचा निवडणुकीत फटका बसेल, अशी शंका त्यांच्या मनात घेर धरून बसली आहे.

सविस्तर वाचा...

10:54 (IST) 28 Feb 2024
सरकारने आमची फसवणूक केली - मनोज जरांगे

मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. सरकारने शिष्टमंडळ पाठवून आमची फसवणूक केली आहे. आज देऊ, उद्या देऊ, अशी आश्वासने आम्हाला देण्यात आली होती. यामध्ये राज्याचे मंत्री, अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आहेत. या सर्वांवर आम्ही महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू. आम्हाला जर ते कायदेशीर कचाट्यात घेणार असतील तर आम्हीही त्यांना कायदेशीर अडचणीत आणू, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Updates in Marathi

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ लाइव्ह (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)