Mumbai Pune Nagpur Weather Live Updates : मोसमी पावसाने संपूर्ण देश व्यापला असतानाच राज्यातील विविध भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय असल्याने पाच दिवस किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह किनारपट्टीवर तीव्र अलर्ट देण्यात आला आहे. तर तळ कोकणसह किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर गेले तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईताला वारजे पोलिसांनी अटक केली. आकाश सिब्बन गौड (वय २३, रा. .शिवणे, मूळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गंभीर गु्न्हे दाखल आहेत.
मुंबई शहर तसंच मुंबई महानगर, पुणे – नागपूर शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती ही या live blog च्या माध्यमातून मिळेल.
Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi
येऊरमध्ये वाढदिवस साजरा करणे पडले महाग, एकावर गुन्हा दाखल
ठाणे : येऊरच्या जंगलात वाढदिवस साजरा करणे तरुणाला महागात पडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरिश ठाणेकर असे त्या तरुणाचे नाव आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयासमोर बाधित गाळेधारकांचे उपोषण; बेकायदा बांधकामांमुळे पुनर्विकास रखडल्या आरोप, बांधकामे हटविण्याची मागणी
ठाणे : येथील वर्तकनगर भागातील म्हाडाच्या भुखंडावरील अधिकृत गाळेधारकांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सोमवारापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. बेकायदा बांधकामांमुळे गेल्या तीन वर्षांपासून पुनर्विकास प्रकल्प रखडल्याचा आरोप करत येथील गाळेधारकांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
अंबरनाथ, बदलापूर पालिका नगररचनाकारांशिवाय
अंबरनाथ : अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगररचना पदावर अधिकारी मिळत नसल्याने या विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे शहर नियोजनाचा खेळखंडोबा झाला असून विविध बांधकाम परवानग्यांची कामे रखडल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत.
डोंबिवलीत जोशी शाळा ते म्हसोबा चौक रखडलेल्या ठाकुर्ली पुलाच्या पूर्णत्वासाठी शिवसेना-मनसेचे आंदोलन
स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात आंदोलन पेटले… नागपूरात विदर्भ राज्य आघाडीकडून…
एस.टी.च्या प्रवास भाड्यात १५ टक्के सूट हवी… ही आहे नवीन योजना
Video : "नितीन गडकरी साहेब, आम्हाला अपघातातून वाचवा हो…" नागरिकांचा टाहो…
फडणवीस मंचावर असताना सरन्यायाधीश गवईकडून उद्धव ठाकरेंचे भरभरून कौतुक, म्हणाले, कोव्हिड काळातही….
अतिक्रमणमुक्त हडपसरच्या मागणीसाठी शिवसेनेचे हडपसर क्षेत्रीय कार्यालय परिसरात भाजीपाल्याची हातगाडी नेऊन ठिय्या आंदोलन
मद्यपी मोटार चालकाची पोलिसांशी अरेरावी, कारवाईस विरोध केल्याप्रकरणी गुन्हा; चालकाकडे रिव्हाॅल्वर सापडले
एक लाखावर गेलेले सोन्याचे दर घसरून ९५ हजारावर… हे आहे आजचे दर…
नागपूर : सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेल्यावर आता खाली येत असल्याची आनंददायी बातमी आहे. हे दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणि पावसाळ्याच्या सुरवातीला सोमवारी (३० जून २०२५) २४ कॅरेटचे दर प्रति दहा ग्राम ९५ हजाराच्या जवळपास आले आहे.
अचानकच्या रिक्षा भाडेवाढीने कल्याण-डोंबिवलीतील प्रवासी त्रस्त; रिक्षा चालकांकडून मनमानीने भाडे वसुली
कल्याण : कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागात महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे रिक्षा भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. ही भाडे वाढ तीन ते पाच रूपयांपर्यंत आहे. परंतु, या भाडे वाढीचा गैरफायदा घेत रिक्षा चालकांनी प्रवासांकडून वाढीव पाच ते दहा रूपये वसुलीला सुरूवात केली आहे.
टोल घेता, तर सुविधा द्या ! आमदार विलास तरे याने घेतली भूमिका
पालघर : मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर खानिवडे टोल नाक्यावर सातत्याने निर्माण होणारी अति तीव्र वाहतूक कोंडी, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि प्रशासनाचा बेजबाबदारपणा याविरोधात बोईसरचे आमदार विलास तरे यांनी ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे.
पीओपीच्या मोठ्या मूर्ती विसर्जन धोरणासाठी सरकारला मुदतवाढ;२३ जुलैपर्यंत निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या मोठ्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीं विसर्जनाच्या मुद्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदत देण्याची मागणी राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केली.
मार्क्स आणले शंभर पैकी शंभर, कमळी आमची एकच नंबर; पण या कमळीने इव्हीएम वापरले होते का?, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना एका मराठी मालिकेच्या वृत्तपत्रातील जाहिरातीचा आधार घेत भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे टोला हाणत जोरदार टीका केली आहे.
तनिष्काच्या शुभेच्छा फलकाची चर्चा; मंत्री संजय राठोड यांच्या तत्परतेने वाचला होता जीव…
“सात बारा करून घेऊ कोरा, नाहीतर सरकारचे वाजवू बारा”, बच्चू कडूंचा नवीन नारा..
अरबी समुद्रात चक्राकार वारे, राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज
प्रकाश आंबेडकर म्हणाले " जगाच्या अर्थव्यवस्थेचा ताबा चारित्र्यहिनांच्या" ....
विद्यार्थी मिळवण्यासाठी महाविद्यालयांकडून ‘कमिशन एजंट’ नियुक्त; गोंडवाना विद्यापीठ ठराविक विचार रुजवण्यात व्यस्त, महाविद्यालये सुस्त
भाजप वगळता इतर पक्षांशी युतीसाठी ‘वंचित’ तयार - प्रा. अंजली आंबेडकर; प्रभाग पद्धतीच्या माध्यमातून छोट्या पक्षांना…
महाबोधी विहाराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, व्यवस्थापन बौद्धांकडे देण्यास…
उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात उबाठाची शाखा; आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सक्रिय
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातील कोपरी भागात असलेल्या ठाणेकर वाडी परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नवी शाखा खुली झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सक्रिय झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
मराठी एकीचा विजय…ही एकी अशीच राहू दे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
ठाणे : पक्षाभिनिवेश विसरून मराठी भाषेसाठी, मराठी मायबोलीसाठी तमाम मराठी मने जुळताना दिसली. त्याचा मनापासून आनंद वाटला. हा विजय सर्वांचाच आहे, त्यापेक्षा हा विजय मराठी एकीचा आहे. ही एकी अशीच राहू दे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
डॉक्टर महिलेला सायबर चोरट्यांकडून पाच लाखांचा गंडा; गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी
पुणे : गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एरंडवणे भागातील एका डॉक्टर महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल संच हॅक करुन बँक खात्यातून परस्पर रोकड लांबविल्याचे उघडकीस आले आहे.
अश्लील चित्रफितीच्या आधारे बलात्कार; ८ तोळे सोने आणि दिड लाखांची खंडणी
मुंबई – एका महिलेला अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावून दिड लाखांची खंडणी उकळण्यात आली आहे. अश्लील चित्रफित सर्वदूर प्रसारित (व्हायरल) करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. अखेर महिलेने तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
‘मकोका’ कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा; वारजे पोलिसांकडून सराईत गजाआड
पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर गेले तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईताला वारजे पोलिसांनी अटक केली. आकाश सिब्बन गौड (वय २३, रा. .शिवणे, मूळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गंभीर गु्न्हे दाखल आहेत.
अरबी समुद्रात चक्राकार वारे, राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई, ठाण्यासह किनारपट्टीवर तीव्र अलर्ट देण्यात आला आहे. तर तळ कोकणसह किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ३० जून २०२५