दक्षिण कोरियाची वेबसीरीज ‘स्क्विड गेम’चा तिसरा आणि अखेरचा सीझन २७ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या सीझनचा शेवट अनेक चाहत्यांना आवडला नाही, ज्यामुळे आता टीका होत आहे. शेवटाबद्दल लेखक-दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युक यांनी स्पष्टीकरण दिले की, गि-हूनच्या बलिदानातून जागतिक समस्यांवर संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेवटच्या भागातील गि-हूनचा डायलॉग सोशल मीडियावर चर्चेत आहे.