Maharashtra Politics : देशभर सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. सर्व पक्षांकडून प्रचार, रॅल्या, जाहिरात आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे प्रकार चालू आहेत. तसेच उद्या (१९ एप्रिल) लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भात उद्या मतदान होणार आहे. त्यामुळे विदर्भातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. तर इतर सहा टप्प्यांमधील मतदानाला अद्याप वेळ आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार चालू आहे. दिवसभर होणाऱ्या प्रचाराच्या आणि उद्या होणाऱ्या मतदानासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच इतर राजकीय बातम्यांवरही आपलं लक्ष असेल.

Live Updates

Marathi News Live Today, 18 April 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

20:01 (IST) 18 Apr 2024
मोदींचे इंजिन बिघडलेले अन् देशाला आधोगतीकडे नेणारे, नाना पटोले यांचे टीकास्त्र

सोलापूर : देशाच्या विकासासाठी म्हटले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तथाकथित इंजिन पार बिघडले असून हे इंजिन विकासाकडे नव्हे तर अधोगतीकडे नेणारे आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्याचा समाचार घेतला.

वाचा सविस्तर…

20:00 (IST) 18 Apr 2024
हातकणंगलेत आणखी एका शेतकरी नेत्याचा अर्ज दाखल; रघुनाथदादा पाटील रिंगणात

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बहुरंगी होत असताना त्यामध्ये शेतकरी नेत्यांची दाटी होताना दिसत आहे. भारतीय जवान किसान पक्षाचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासमवेत निवडक कार्यकर्ते होते.

वाचा सविस्तर…

18:08 (IST) 18 Apr 2024
‘देवेंद्र फडणवीसांसारखा खोटारडा माणूस इतिहासात…’ संजय राऊत म्‍हणाले, पुलवामासारखा भयंकर प्रकार…’

अमरावती : उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासारखा खोटारडा माणूस महाराष्‍ट्राच्‍या इतिहासात झालेला नाही. पुत्रप्रेम हे काय असते, हे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्‍याबाबतीत अनेकवेळा दिसून आले आहे.

सविस्तर वाचा…

17:49 (IST) 18 Apr 2024
एस.टी.बसेसवर शिवसेनेच्या जाहिराती ! आचारसंहितेचा भंग; काँग्रेसची आयोगाकडे तक्रार

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहिरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सविस्तर वाचा…

16:37 (IST) 18 Apr 2024
‘यमराज’ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात ? रेड्यावर बसून उमेदवाराची जोरदार एन्ट्री

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार हे चक्क रेड्यावर बसून यमराजाच्या वेशात निवडणूक अधिकारी कार्यालयात आले.

वाचा सविस्तर…

16:23 (IST) 18 Apr 2024
ठाणे लोकसभेच्या रिंगणात ओबीसी बहुजन पार्टीचा उमदेवार

ठाणे : ओबीसींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असल्याची चर्चा असतानाच, प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीने ठाणे लोकसभेच्या रिंगणात उमदेवार उतरविला आहे. धनगर समाजाचे मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी देण्यात आली असून यामुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा…

16:09 (IST) 18 Apr 2024
राज भगतने रचला इतिहास! वसईतून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणारा पहिला तरूण ठरला

वसई : विरारच्या डोंगरपाडा मध्ये राहणार्‍या राज भगत या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करून नवीन इतिहास रचला आहे. कारण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वसईतील युपीएससी उत्तीर्ण होणारा तो पहिलाच तरुण ठरला आहे.

वाचा सविस्तर…

16:08 (IST) 18 Apr 2024
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!

मुंबई : शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा विकासकांकडून पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांसाठी उभारलेल्या पुनर्विकसित इमारतीही आता मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींना पुनर्विकासाची आवश्यकता असली तरी चटईक्षेत्रफळाअभावी अडचण निर्माण झाली आहे.

वाचा सविस्तर…

15:58 (IST) 18 Apr 2024
सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन

अलिबाग- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज रायगड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेना आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.

15:57 (IST) 18 Apr 2024
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी

नाशिक – तळपत्या उन्हात ग्रामीण भागात सध्या उन्हाळ कांदा काढणी आणि त्याच्या प्रतवारीचे काम प्रगतीपथावर आहे. बहुसंख्य मतदार कांदा उत्पादक असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आपसूकच कांदा हाच प्रचारात मुख्य मुद्दा झाला आहे.

सविस्तर वाचा…

15:35 (IST) 18 Apr 2024
संगीत दिग्दर्शनकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शनकाची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातून एकाला अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले.

वाचा सविस्तर…

15:34 (IST) 18 Apr 2024
रावेरमध्ये संतोष चौधरी यांची नाराजी दूर करण्याचे शरद पवार यांच्यासमोर आव्हान

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसमोर उमेदवारी न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंड थंड करण्यासाठी २० आणि २१ एप्रिलला शरद पवार दौऱ्यावर येत आहेत. ठाकरे गटाकडूनही चौधरी यांची समजूत काढली जाणार आहे.

वाचा सविस्तर…

15:03 (IST) 18 Apr 2024
मोदींचा पराभव करायला तयार रहा, शरद पवार यांच्याकडून हल्लाबोल

पुणे : पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर, बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे जाहीर सभा झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संवाद साधला.

सविस्तर वाचा…

14:22 (IST) 18 Apr 2024
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”

गडचिरोली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मी आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबई विमानतळावर बैठक झाली. त्यात वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली. वडेट्टीवार तेव्हा मंत्री होते. तरीपण त्यांना भाजप प्रवेशाची घाई होती, असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज पत्रकारपरिषदेत केला.

सविस्तर वाचा…

14:10 (IST) 18 Apr 2024
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे

उरण : रायगडमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर सिडको, एमएमआरडीए किंवा कोणत्याही शासकीय प्राधिकरणाने विकासाचे नियोजन करण्यापूर्वी येथील स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घ्यावे. त्यांचा सहभाग या नियोजनात घ्यावा अशा सूचना शेतकरी म्हणून सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाचे सचिव सुधाकर पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केल्या आहे.

सविस्तर वाचा..

13:59 (IST) 18 Apr 2024
सोलापूर : शक्तिप्रदर्शन करीत प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; राम, सीता, लक्ष्मणही अवतरले

सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

13:58 (IST) 18 Apr 2024
“बारामतीत नवा इतिहास घडून सुनबाई दिल्लीला जातील अन्…”, सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत फडणवीसांचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज त्यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ महायुतीची आज पुण्यात जाहीर सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेला उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले, बारामतीत वहिणींना कोणीही थांबवू शकणार नाही. बारामतीच्या मागील निवडणुकीत दोन नंबरवर असलेल्या उमेदवार कांचन कुल, तिसऱ्या नंबरवर असणारे उमेदवार नवनाथ पडळकर यांच्यासह सर्वच तगडे नेते इथे आहेत. आता आपल्याला केवळ बारामतीत घरोघरी जाऊन, जनतेपर्यंत पोहोचून लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणायचं आहे. मला विश्वास आहे की, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातीलच. आपल्या आशीर्वादाने नवा इतिहास घडेल आणि सुनबाई खासदार बनून दिल्लीला जातील.

13:55 (IST) 18 Apr 2024
राजू शेट्टींचे एक पाऊल मागे! बुलढाण्यात रविकांत तुपकर यांना पाठिंबा

बुलढाणा : मागील काही काळापासून असलेले मतभेद, दुरावा विसरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलढाणा मतदारसंघातील अपक्ष तथा संघटनेचे जुनेजाणते कार्यकर्ते रविकांत तुपकर यांना पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी यांनी एक पाऊल मागे घेत तुपकरांसोबत आपले मागील काळात मतभेद होते, मनभेद नाही, हे सूचित केले आहे.

सविस्तर वाचा…

13:46 (IST) 18 Apr 2024
कल्याणमध्ये घरात रंगकामासाठी आणलेल्या रंगाऱ्याकडून चार लाखाची चोरी

कल्याण : घरामध्ये रंगकामासाठी आणलेल्या एका रंगाऱ्याने घरातील कुटुंबीयांची नजर चुकवून घरातील बॅगेत ठेवलेले चार लाख रूपयांची रोख रक्कम चोरून नेली असल्याचा संशय व्यक्त करून कुटुंब प्रमुखाने रंगाऱ्या विरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

13:35 (IST) 18 Apr 2024
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा १७ एप्रिल रोजी संध्याकाळी थंडावल्या. उद्या १९ एप्रिलला येथे मतदान होत आहे. राज्यातील भाजप-राष्ट्रवादी युतीचा परिणाम आता कार्यकर्त्यांवरही दिसून येत आहे.

सविस्तर वाचा…

13:15 (IST) 18 Apr 2024
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसही घामांच्या धारात

बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यातच आता सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पाणी वितरण यंत्रणेवरही परिणाम होऊ लागला आहे.

वाचा सविस्तर….

13:08 (IST) 18 Apr 2024
नागपूरमध्ये उद्या मतदान, ८० कि.मी.वर मोदींची सभा

नागपूर: प्रत्यक्ष मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी जाहीर प्रचार थांबवला जात असला तरी छुपा आणि अप्रत्यक्ष प्रचार सुरू असतो. यंदा अनेक टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे याच अनुषंगाने बघितले जाते.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 18 Apr 2024
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

मुंबई : मुंबईसह ठाणे जिल्ह्यात बुधवारी तापमानात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सविस्तर वाचा….

12:45 (IST) 18 Apr 2024
कोंढव्यात बांधकाम पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून; इमारतीवरून फेकून दिले

पुणे : कोंढवा भागात एका बांधकाम पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. बांधकाम पर्यवेक्षकाला इमारतीवरून फेकून देण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा…

12:41 (IST) 18 Apr 2024
मनमाडकरांना दिलासा- आता १७ दिवसांआड पाणी

मनमाड : शहराला यापुढे १६ ते १७ दिवसांआड पाणी पुरवठा करावा, प्रत्येक विभागात अडीच तास पाणी वितरीत करावे, असे आदेश नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी प्रशासनाला दिले आहेत. शहरातील पाणी वितरणाबाबत मुख्याधिकारी चौधरी यांनी सर्व संबंधितांची तातडीची बैठक बोलावली होती.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 18 Apr 2024
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात

मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात सुरू असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) रस्ता रोधक हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करीत आहे. आतापर्यंत ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील १४,७१६ चौरस मीटर लांबीचे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.

सविस्तर वाचा…

12:28 (IST) 18 Apr 2024
सुळे आणि धंगेकरांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला

रवींद्र धंगेकरांनी पुण्यातून तर खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी बारामतीमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला.

12:10 (IST) 18 Apr 2024
नागपूर : तीन महिन्यांत रस्ते अपघातात १०२ जणांचा मृत्यू , शहरात ३११ अपघात…

नागपूर : शहर पोलीस आणि परिवहन विभाग रस्ते अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत असले तरी शहरात रस्ते अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यांत ३११ अपघातात तब्बल १०२ जणांचा बळी गेला असून २८४ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

12:05 (IST) 18 Apr 2024
ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

ठाणे : आंतरराष्ट्रीय विमान कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ३७ लाख ३८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

11:54 (IST) 18 Apr 2024
विलिंग्डन क्लब सदस्यांचा नियुक्ती निर्णय रद्द करण्याची मागणी

मुंबई : ताडदेव येथील विलिंग्डन क्लबमध्ये ५० व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांना मोफत आजीव सदस्यत्व देण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या क्लबमध्ये आजीव सदस्यत्व देण्याच्या शासन निर्णयात जशी सुधारणा केली, तशीच विलिंग्डन क्लबच्या शासन निर्णयातही करावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून केली आहे.

“काल-परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं अन् मी…”, अजित पवारांचं वक्तव्य

लोकसभेच्या महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक म्हणजे बारामतीतली पवार कुटुंबातली लढत. या मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजयमधला सामना रंगणार आहे. दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीत बोलताना प्रतिभा काकींना प्रचारात उतरवलं आणि डोक्यावर हात मारला असं म्हटलं आहे. अजित पवार म्हणाले,“जे काही लोक माझ्या विरोधात बोलत आहेत मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांचाही फायदा करुन दिला आहे. कुणालाही रिकाम्या हाताने पाठवलेलं नाही. त्यावेळी इतकं फिरावंही लागायचं नाही. आता माझा परिवार सोडून राहिलेला माझा सगळा परिवार माझ्या विरोधात फिरतो आहे, बोलतो आहे. पायाला भिंगरी लागल्यासारख्या सभा घेत आहेत. काल-परवा तर प्रतिभाकाकीला प्रचारात उतरवलं मी तर डोक्यावर हात मारला. काकी पण १९९० पासून प्रचाराला आलेल्या तुम्हीही पाहिल्या नाहीत मी पण पाहिल्या नाहीत.”