मेघालयमध्ये मधुचंद्रासाठी गेलेल्या सोनम आणि राजा रघुवंशीच्या घटनेनंतर बिहारमधून अशीच एक घटना समोर आली आहे. औरंगाबाद येथील प्रियांशु कुमार सिंह याची पत्नी गुंजादेवीने तिच्या आत्याच्या नवऱ्यासह मिळून त्याची हत्या केली. लग्नानंतर अवघ्या ४५ दिवसांत ही हत्या घडली. गुंजादेवी आणि तिच्या आत्याच्या नवऱ्याचे १५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पोलिसांनी गुंजादेवीसह तिघांना अटक केली असून, शूटर्स आणि जीवन सिंह यांचा शोध घेत आहेत.