Mumbai Maharashtra News Update : महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर सांगली आणि मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. विश्वाजीत कदम यांनी सांगलीच्या जागेचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे, तर मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकडवाड यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

याशिवाय काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेड येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावरूनही आज राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra Breaking News Updates 12 April 2024 : महायुतीत दोन जागांचा तिढा अद्याप कायम; रत्नागिरी-सिंधुदुर्ग, साताऱ्यासह ११ मतदारसंघांत आजपासून निवडणूक प्रक्रिया

20:01 (IST) 12 Apr 2024
महिला प्रवाशाने घेतला महिला तिकिट तपासनिसाचा चावा, वसई रोड रेल्वे स्थानकातील घटना

वसई : महिला तिकिट तपासनिसाबरोबर झालेल्या वादातून एका महिला प्रवाशाने चक्क तिकिट तपासनिसाच्या हाताचा जोरात चावा घेतला आहे. गुरूवारी संध्याकाळी वसई रोड रेल्वे स्थानकात ही घटना घडली. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी ३२ वर्षीय महिला प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

19:38 (IST) 12 Apr 2024
जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुप्रिया सुळेंना राजकीय फायदा घ्यायचा असता तर…

ठाणे : सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे रक्ताचे नाते आहे. सुप्रिया सुळे यांना राजकीय फायदा घ्यायचाच असता तर, त्यांनी सुप्रिया पवार-सुळे असे नाव लावले असते, असे प्रतिउत्तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. तसेच लोकसभा निवडणुका या कर्तत्वावर लढविल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

19:37 (IST) 12 Apr 2024
एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांनी लोकसभा लढविण्यास सांगितले होते, पण त्यांनी नकार दिला – खासदार राजन विचारे

ठाणे : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्याचा कारभार हाकत असल्याने २००९ मध्ये ठाणे लोकसभा लढविण्याची सूचना केली होती. पंरतु एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता, ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. तिथे उमेदवार जाहीर होत नव्हता असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला.

सविस्तर वाचा…

19:35 (IST) 12 Apr 2024
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका

कल्याण : आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांनी आपल्यावर अंबरनाथ येथे आपल्या बोलण्यावरून टीका केली असली तरी, तो त्यांचा दोष नाही. ज्या पक्षाचा बॉस नकला करणारा असतो, त्याप्रमाणे त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही नकलाच करणारे असतात.

सविस्तर वाचा…

18:22 (IST) 12 Apr 2024
घराचा ताबा विलंबाने मिळाल्यास खरेदीदार व्याजासाठी पात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खरेदीदारांना दिलासा

खरेदीदाराला घराचा ताबा उशिरा मिळाल्यास तो विकासकाकडे व्याजाची मागणी करू शकतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडे दिला आहे.

सविस्तर वाचा…

18:19 (IST) 12 Apr 2024
“सिध्देश्वरची चिमणी पाडल्याचा बदला घ्या, भाजपला धडा शिकवा”, धर्मराज काडादी यांची भूमिका

सोलापूर : वीरशैव लिंगायत समाजाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याचा मुद्दा यंदा सोलापूर लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आला आहे. या प्रश्नावर कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडल्याचा बदला घेऊन भाजपला धडा शिकविण्याची हाक कारखान्याच्या २७ हजार सभासद शेतकऱ्यांना दिली आहे.

सविस्तर वाचा…

18:18 (IST) 12 Apr 2024
मविआमध्ये बंडखोरीची हालचाल, तालुका समिती बरखास्त, फलकावरील नाव पुसले

सांगली : मविआमधून सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही याच्या निषेधार्थ शुक्रवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर फलकावरील जिल्हा काँग्रेस समितीच्या नावातील काँग्रेस हा शब्द पुसण्यात आला.

सविस्तर वाचा…

18:15 (IST) 12 Apr 2024
“सिध्देश्वरची चिमणी पाडल्याचा बदला घ्या, भाजपला धडा शिकवा”, धर्मराज काडादी यांची भूमिका

अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडल्याचा बदला घेऊन भाजपला धडा शिकविण्याची हाक कारखान्याच्या २७ हजार सभासद शेतकऱ्यांना दिली आहे.

सविस्तर वाचा…

17:47 (IST) 12 Apr 2024
“बटन दाबले आणि समस्या सुटली, असे होत नाही…”, रणजितसिंह निंबाळकरांच्या वक्तव्याने….

तीनही पक्षांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, असे मत भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा…

17:18 (IST) 12 Apr 2024
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….

त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मुंबईहून त्या थेट आपल्या गावी रिसोड येथे पोहोचल्या.

सविस्तर वाचा…

16:44 (IST) 12 Apr 2024
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित

पुणे : मध्यभागातील एका नामांकित शाळेत नववीतील मुलाला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची चित्रफीत प्रसारित झाली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

16:22 (IST) 12 Apr 2024
यवतमाळ : अभयारण्यात वाघासोबत सेल्फी घेणे पडले महागात; वनक्षेत्र अधिकारी…

आरएफओ विवेक येवतकर यांनी वन्यजीव अधिनियमांना पायदळी तुडवत अभयारण्यातील कोअर झोनमध्ये स्वत:च्या खासगी वाहनाने प्रवेश केला.

सविस्तर वाचा…

16:18 (IST) 12 Apr 2024
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर

मुंबई : अमर महल – सांताक्रूझ, पश्चिम द्रुतगती मार्ग असा थेट सिग्नलमुक्त आणि अतिवेगवान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आता जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पातील वाकोला नाला – पानबाई इंटरनॅशनल स्कूल उन्नत रस्त्याचे काम एप्रिलमध्ये पूर्ण होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जाहीर केले होते.

सविस्तर वाचा…

16:17 (IST) 12 Apr 2024
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

मुंबई : पालक आणि मुलांमधील मालमत्तेच्या वादात विशेषत: पालकांच्या स्थावर मालमत्तेमध्ये वाटा नाकारलेल्या मुलांकडून पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायद्याचा गैरवापर होत असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केली.

सविस्तर वाचा…

16:16 (IST) 12 Apr 2024
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हामध्ये सतत काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो.

सविस्तर वाचा…

16:15 (IST) 12 Apr 2024
हाफकिनकडून आणखी १६ औषधांचे उत्पादन!

मुंबई : राज्य सरकारने हाफकिनला आणखी १६ औषधांची निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. परिणामी, हाफकिन निर्मिती करीत असलेल्या औषधांची संख्या २५ हून अधिक होणार आहे.

हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ निर्मिती करीत असलेल्या सर्पदंश, विंचूदंश आणि पोलिओवरील लस, खोकला व तापावरील औषध यांना जगभरामधून मागणी आहे. त्यामुळेच हाफकिनने २०२३ मध्ये २०४ कोटी रुपयांच्या औषधांची विक्रमी विक्री केली होती.

16:13 (IST) 12 Apr 2024
घटनाकारांची छबी, स्वाक्षरी आता लेखणीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण

पुणे : ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, असा संदेश देत बहुजनांना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची छबी आणि स्वाक्षरी आता लेखणीवर आली आहे.

वाचा सविस्तर…

16:03 (IST) 12 Apr 2024
चंद्रपूर : निवडणुकीतील उमेदवारांची विकासकामे दाखवा अन् बक्षिस मिळवा! समाज माध्यमांवर पोस्ट सार्वत्रिक; भाजप – काँग्रेसमध्ये जुंपली

गडचिरोली लोकसभेचे भाजप उमेदवार खासदार अशोक नेते यांचे दहा वर्षातील एक विकास काम दाखवा आणि बक्षिस मिळवा असे आवाहन विरोधी पक्ष नेेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

सविस्तर वाचा…

15:58 (IST) 12 Apr 2024
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित

पुणे : डेक्कन जिमखाना परिसरात नदीपात्रात १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याची विवस्त्रावस्थेतील चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

15:44 (IST) 12 Apr 2024
नागपूर : भरधाव शिवशाही बसने वाटसरूला उडवले

रोशन बन्सोड हा ११ एप्रिलच्या संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वडधामनातील सारंग बार जवळून पायी रस्ता ओलांडत होता.

सविस्तर वाचा…

15:21 (IST) 12 Apr 2024
दिंडोरीत वंचितकडून ‘महाराष्ट्र केसरी’ मैदानात

नाशिक – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने १९८६ मधील महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिलवान गुलाब बर्डे यांना रिंगणात उतरवले आहे. यानिमित्ताने वंचित आघाडीने दुर्लक्षित भिल्ल समाजाला प्रथमच उमेदवारी देत न्याय दिल्याची भावना बर्डे यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा…

15:17 (IST) 12 Apr 2024
अवकाळी पावसाचा मुक्काम आता १५ एप्रिलपर्यंत, राज्यात आज कुठे आहे इशारा जाणून घ्या

येत्या १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे.

सविस्तर वाचा…

14:56 (IST) 12 Apr 2024
उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय मोदी-शाहांच्या सभेला महत्त्व उरत नाही, अंबादास दानवेंची टीका

उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय नरेंद्र मोदी आणि अमित शाह याच्या कोणत्याही सभेला महत्त्व राहत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

14:39 (IST) 12 Apr 2024
आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात; पंचरंगी लढतीमुळे चुरस वाढली

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

सविस्तर वाचा…

14:31 (IST) 12 Apr 2024
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय

एखादी बस ५-७ मिनिटांत येणार असेल आणि नेमके त्याच वेळेस बेस्ट वा अन्य शहर वाहतूक बस आल्या तर प्रवासी त्या बसने जाण्याचे टाळत होते.

सविस्तर वाचा…

14:22 (IST) 12 Apr 2024
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित

मुंबई : ठाण्यातील माजिवडे येथील वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्यामुळे रखडला आहे. हा प्रकल्प व्यवहार्य ठरावा आणि तो मार्गी लागावा म्हणून म्हाडा प्राधिकरणाने आपल्या हिश्शातील भूखंडावर अतिरिक्त घरे बांधण्याऐवजी उपलब्ध भूखंडाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकण मंडळाने दोन भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा मागविली आहे.

सविस्तर वाचा…

14:21 (IST) 12 Apr 2024
उरण-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव, नवघर फाटा ते बोकडवीरा पोलीस चौकीपर्यंत चौपदरी मार्ग

उरणमधील वाढत्या नागरी व औद्याोगिकीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांतही अनेक पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघातांतही वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा…

14:20 (IST) 12 Apr 2024
बांधकाम व्यावसायिक जयेश तन्नावर १३ वा गुन्हा दाखल

मुंबईः आंबोली पोलिसांनी विकासक जयेश तन्ना (५६) विरोधात नुकताच फसवणुकीचा आणखी एक गुन्ह दाखल केला आहे. जयेश तन्ना विरोधात दाखल झालेला हा १३ वा गुन्हा आहे. या प्रकरणात तन्ना आणि त्याच्या कुटुंबीयांवर अंधेरी (पश्चिम) येथील एका व्यावसायिकाला तीन दुकाने विकण्याच्या नावाखाली त्याची तीन कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तन्नासह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14:19 (IST) 12 Apr 2024
परळ येथे अपघातात पोलीस शिपायाचा मृत्यू

मुंबईः परळ येथे दुचाकीला दिलेल्या धडकेत पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. यावेळी दुचाकीवर बसलेला दुसरा तरूणही गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

13:51 (IST) 12 Apr 2024
हाफकिनकडून आणखी १६ औषधांचे उत्पादन!

हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ निर्मिती करीत असलेल्या सर्पदंश, विंचूदंश आणि पोलिओवरील लस, खोकला व तापावरील औषध यांना जगभरामधून मागणी आहे.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 12 Apr 2024
पीडितांना नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश, ॲसिड हल्ल्याचे प्रकरण

याचिकाकर्त्या तीन पीडितांवर ४ ऑक्टोबर २०१० रोजी प्राणघातक हल्ला झाला होता.

सविस्तर वाचा…

13:37 (IST) 12 Apr 2024
मुंबई विमानतळावरून दोन कोटींचे सोने जप्त

साडेतीन किलो सोने जप्त करण्यात आले असून सोन्याची किंमत दोन कोटी रुपये आहे.

सविस्तर वाचा…

13:32 (IST) 12 Apr 2024
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा

उरण : उलवे नोडच्या किनाऱ्यावर सिडकोने तिरुपती व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासाठी दिलेल्या भूखंडाच्या सीआरझेड मंजुरीला आव्हान देणारी याचिका पर्यावरणवाद्यांकडून हरित न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर २५ एप्रिलला सुनावणी करण्यात येणार आहे. त्या वेळी याचिका स्वीकारणार की नाही ते स्पष्ट होणार आहे. मात्र…

सविस्तर वाचा…

13:04 (IST) 12 Apr 2024
“पंतप्रधान मोदी हे संघ व भाजपला संपविण्याचे काम करीत आहे”; ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “हफ्ता वसुली…”

सीमावर्ती भागात अन्य राष्ट्र भारताच्या सैनिकांची हत्या करत असताना आता ५६ इंचाची छाती कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला.

सविस्तर वाचा…

12:51 (IST) 12 Apr 2024
नागपूर : दक्षिण-पश्चिममध्ये मतांचा आलेख खाली-वर; लोकसभा-विधानसभेत वेगळे चित्र

नागपूर लोकसभा भाजपने सलग दोनदा चांगल्या मताधिक्याने जिंकली. त्यामुळे नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाऊ लागला आहे.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 12 Apr 2024
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव

नवी मुंबई : महापालिकेच्या विद्युत विभागाकडून कोणतीही परवानगी नसताना फ्लेमिंगो तसेच स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास तसेच नेरुळ येथील टी एस चाणक्य तलाव परिसरातील कांदळवन तसेच पाणथळ क्षेत्रात सौर दिव्यांचे खांब बसवण्याचा प्रताप नवी मुंबई महापालिकेच्या अंगलट आला आहे. याबाबत पर्यावणप्रेमींकडून महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे अखेर गुरुवारी सायंकाळपासून सौर दिव्यांचे खांब काढण्यास सुरुवात झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 12 Apr 2024
अकोला : उमेदवारांपुढे सर्वांना एकसंघ ठेवण्याचे आव्हान! महायुती व आघाडीच्या धर्माचे पालन…

राजकीय भूकंपानंतर गटातटात विभागलेले प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या सोयीनुसार महायुती व ‘मविआ’ या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये एकत्रित आलेत.

सविस्तर वाचा…

12:18 (IST) 12 Apr 2024
कोल्हापूरच्या न्यू कॉजेलमध्ये शाहू महाराजांचा प्रचार होत असल्याचा महायुतीचा आरोप, कार्यकर्ते आक्रमक

कोल्हापूरच्या न्यू कॉजेलमध्ये शाहू महाराजांचा प्रचार होत असल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून प्राचार्यांना जाब विचारण्यासाठी ते महाविद्यालयात दाखल झाले आहेत.

12:01 (IST) 12 Apr 2024
विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाखांची फसवणूक

विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख संगणक अभियंता तरुणीला महागात पडली.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 12 Apr 2024
चंद्रपूर : मतदानाचा सेल्फी अपलोड करा; मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल जिंका

विशेष म्हणजे यात सहभाग घेऊन विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या तीन मतदारांना अनुक्रमे मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल मिळणार आहे.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 12 Apr 2024
नाशिक : लासलगाव बाजारात आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, सरासरी दीड हजार भाव

नाशिक – लेव्ही वसुलीच्या वादातून सलग आठ दिवस ठप्प असणारे कांदा लिलाव लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी सकाळपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात १६ हजार क्विंटलची आवक होऊन त्यास सरासरी दीड हजार रुपये भाव मिळाला.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 12 Apr 2024
वर्धा : ‘या’ आजी घरपोच मतदानाच्या पहिल्या मानकरी

घरपोच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

सविस्तर वाचा…

11:27 (IST) 12 Apr 2024
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र. येथे वाघ हमखास दर्शन देतात असाच पर्यटकांचा अनुभव!

सविस्तर वाचा…

11:22 (IST) 12 Apr 2024
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे

मुंबई : म्हाडा गोरेगावमधील पहाडी परिसरातील गृहप्रकल्पात प्रथमच ३९ मजली निवासी इमारत बांधत आहे. या गृहप्रकल्पात व्यायामशाळा, जलतरण तलाव, विजेवरील वाहनांसाठी चार्जिंग स्थानक, मैदान आदी पंचतारांकीत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून ३९ मजली इमारतीमधील उच्च आणि मध्यम गटातील ३३२ घरांसाठी २०२५ ऐवजी २०२४ मध्येच सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 12 Apr 2024
सीएसएमटी स्थानकात प्रवाशांचे हाल, अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे पुरुष महिलांची कुचंबणा

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासन रेल्वे स्थानकांत महिलांसाठी उच्च दर्जाची स्वच्छतागृहे उपलब्ध करीत असतानाच, दुसरीकडे सीएसएमटी स्थानकातील स्वच्छतागृहे बंद केली जात आहेत. महिलांसाठी दूरवर गर्दीच्या ठिकाणी पर्यायी स्वच्छतागृह उपलब्ध करण्यात आले असून महिलांना तिथवर जाऊन स्वच्छतागृहांच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची प्रचंड कुचंबणा होत आहे.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 12 Apr 2024
पुणे महापालिकेला अखेर जाग! खासगी रुग्णालयांबाबत उचलली पावले

पुण्यातील सुमारे शंभरहून अधिक खासगी रुग्णालये विनापरवाना सुरू असल्याची बाब समोर आली होती.

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 12 Apr 2024
काँग्रेस नेत्यांमधील नाराजीवरून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला

महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर सांगली आणि मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

11:06 (IST) 12 Apr 2024
वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवांची पाचवी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रायगड, उस्मानाबाद, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.

11:01 (IST) 12 Apr 2024
“महाराज अजूनही वेळ गेलेली नाही…”, हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शाहूंना इशारा

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू असताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआचे उमेदवार छत्रपती शाहू यांच्या वारसाहक्का मुद्दा उकरून काढला. त्यामुळे सुरुवातीला विकासावर ही निवडणूक लढवली जाईल, असे सांगणारे आता कोल्हापूरच्या गादीवर बोलू लागले आहेत. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शाहू यांना इशारा देत असताना निवडणूक न लढविण्याची सूचना केली आहे.

सविस्तर वाचा

11:00 (IST) 12 Apr 2024
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका

छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांनी दावा केला होता की, शरद पवार एनडीएत सहभागी होण्यासाठी तयार होते. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, यांचे सर्वांचे (अजित पवार गट) प्रयत्न होते की शरद पवारांना एनडीएत घेऊन जायचे. शरद पवार जर तयार असते, तर एनडीएत गेलेच असते. पण ते कधीच तयार नव्हते. शरद पवार यांनी भाजपाची विचारसरणी स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे आमचा पक्ष फुटला. मात्र पक्ष फुटला तरी शरद पवार यांनी विचारधारा न सोडण्याचा निर्णय घेतला.

सविस्तर वाचा

मुंबई : बारामती, रायगड, कोल्हापूरसह ११ मतदारसंघांमधील मतदानाची अधिसूचना आज, शुक्रवारी जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज आज, शुक्रवारपासून दाखल करण्यात येणार असले तरी महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप की शिंदे गट लढवणार याचा निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर साताऱ्यातही भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.