मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘भांडखोर’ आईमुळे शाळेतून काढलेल्या आदिश्रीला पुन्हा प्रवेश नाही
 


स्पर्धेचे नियम व अटी




‘भांडखोर’ आईमुळे शाळेतून काढलेल्या आदिश्रीला पुन्हा प्रवेश नाही Bookmark and Share Print E-mail
मुंबई, ८ जुलै/प्रतिनिधी
आदिश्री गोपालकृष्णन या इयत्ता नववीतील विद्यार्थिनीच्या आईने गेली तीन वर्षे शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध दंड थोपटून त्यांना सळो की पळो केल्यामुळे आदिश्रीला यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी आधी दिलेला प्रवेश रद्द करण्याच्या गोरेगाव येथील विभ्ग्योर हायस्कूलच्या निर्णयात हस्तक्षेप करून आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्याचा आदेश शाळा व्यवस्थापनास देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने  नकार दिला. गेली सात वर्षे याच शाळेत शिकणाऱ्या आदिश्रीला बिभ्ग्योर हायस्कूलने पालकांनी भरलेली फी स्वीकारून १९ मे रोजी इयत्ता नववीमध्ये रीतसर प्रवेश दिला होता. परंतु ३ जून रोजी शाळा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी शाळेच्या व्यवस्थापनाने आदिश्रीचा प्रवेश रद्द करण्यात आल्याचे पत्र तिच्या पालकांना पाठविले व तिची घेतलेली फी परत करून सोबत तिचा दाखलाही पाठविला. शाळेच्या या कृतीविरुद्ध आदिश्रीच्या आईने केलेल्या रिट याचिकेवर गेले दोन दिवस मुख्य न्यायाधीश न्या. मोहीत शहा व न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठापुढे अक्षरश: खंडाजंगीची सुनावणी झाली होती. आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्याचा अंतरिम आदेश दिला जाणार असेल तर आम्ही शाळेत न जाण्याची, शाळेशी कोणताही पत्रव्यवहार न करण्याची किंवा शाळेसंबंधी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडे कसलीही तक्रार न करण्याची लेखी हमी देण्याची तयारीही आदिश्रीच्या पालकांनी एका टप्प्याला दर्शविली होती. मात्र मागचा अनुभव लक्षात घेता आदिश्रीचे पालक हे अभिवचन पाळतील असे आम्हाला वाटत नाही. आदिश्री हुशार विद्यार्थिनी आहे व तिला शाळेतून काढण्याचा निर्णय आम्हालाही व्यथीत मनानेच घ्यावाच लागला आहे. पण या एकटय़ा विद्यार्थिनीच्या आईच्या ‘भांडखोर’ आईमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण कलुषित झाले आहे. आदिश्रीला पुन्हा शाळेत घ्यावे यासाठी ‘मनसे’ कार्यकर्त्यांनी शाळेत घुसून मोडतोड केल्याने इतर १७०० विद्यार्थ्यांचे पालक धास्तावलेले आहेत. शिक्षकवर्ग भीतीच्या छायेत काम करीत आहे. अशा परिस्थितीत इतर विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्यास आम्ही तयार नाही, असे शाळेच्या व्यवस्थापनाने ठामपणे सांगितले होते.
या पाश्र्वभूमीवर याचिका फेटाळताना खंडपीठाने नमूद केले की, शाळा व पालक यांच्यात गेली तीन वर्षे जुंपलेल्या भांडणामुळे आधीच आदिश्री कमालीच्या तणावाखाली आहे. अशात तिला पुन्हा त्याच शाळेत प्रवेश देण्याचा आदेश देणे तिच्या हिताचे होणार नाही, असे आम्हाला वाटते. इतरत्र कुठे प्रेवश घेण्यासाठी खरे तर आता उशीर झाला आहे. पण आदिश्रीचे पालक तिच्या प्रवेशासाठी अन्य शाळेत गेले तर केवळ उशीर झाला आहे एवढय़ाच कारणावरून तिला प्रवेश नाकारला जाऊ नये, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
मुख्य न्यायाधीशांनी लघुलेखकास सांगितलेले निकालपत्र नीटसे ऐकू आले नाही. त्यामुळे अर्जदारांचे वकील अॅड. डॉ. बी. के. सुब्बाराव यांनी आम्ही उपस्थित केलेल्या कायदेशीर मुद्दय़ांचे काय, असे विचारले असता न्या. धर्माधिकारी यांनी आम्ही निकालपत्रात त्याचा परामर्ष घेतला आहे, असे सांगितले.
माध्यमिक शाळा संहितेनुसार पालकांच्या कथित गैरवर्तनाबद्दल पाल्याला शाळेतून काढून टाकणे पूर्णपणे बेकायदा आहे आणि ही कारवाई करण्यापूर्वी पालकांना पूर्वसूचना देण्याचे नैसर्गिक न्यायाचे तत्त्वही पाळले गेले नाही, असे मुद्दे त्यांनी मांडले होते. न्यायालयाने यावर नेमका काय निकाल दिला हे सविस्तर निकालपत्र हाती पडल्यावरच कळू शकेल. शाळा व्यवस्थापनाने अॅस्पी चिनॉय, जनक द्वारकादास व नवरोज सिरवई अशा बडय़ा वकिलांची फौज उभी केली होती.
 बिभ्ग्योर हायस्कूल ही शाळा ‘आयसीएसई’ शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. दोन वर्षांपूर्व त्यांनी वार्षिक फी ३४ हजारावरून वाढवून एकदम ८४ हजार केली. बाकीच्या सर्व पालकांनी ही फीवाढ निमूटपणे स्वीकारली. परंतु आदिश्रीच्या आईने त्याविरुद्ध शिक्षण विभागाकडे तत्कार केली. शिक्षण उपसंचालकांनी चौकशी केली व शाळेला फी कमी करण्याचा आदेश दिला. त्यानुसारच फी भरण्याची भूमिका आदिश्रीच्या पालकांनी घेतली. त्यावरून शाळा व्यवस्थापन व आदिश्रीचे पालक यांच्यात वारंवार खटके सुरु झाले. आदिश्रीच्या आईने गेल्या तीन वर्षांत शाळा व त्यांच्या व्यस्थापनाविरुद्ध विविध ठिकाणी एकूण २१ तक्रारी केल्या आहेत. या दोघांमध्ये विविध न्यायालयांमध्ये एकूण १२ प्रकरणे सुरु आहेत किंवा याआधी लढविली गेली आहेत.   
  • haiyohaiyaiyo  - भारतात न्याय्य न्याय मागणे-भांडणे पाप नाही.
    भारतात न्याय्य न्याय मागणे-भांडणे पाप नाही. ही पापे असली असती तर न्यायालये चाललीच नसती. असो. मात्र, न्याय्य न्याय मागताना अथवा लोकसत्तोक्त संज्ञेप्रमाणे 'भांडताना' पालन करावयाचे काही यम-नियम आहेत, त्यांचे पालन करणे हे न्याय मिळणे - न मिळणे ह्या अंतिम निर्णयावर फार मोठा प्रभाव टाकून जाते.

    आदिश्रीच्या आईने शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध दंड थोपटून सलग गेली तीन वर्षे त्यांना सळो की पळो केल्याचे नोंदवलेले दिसते. ह्या मातेचा धाक असा की लिखित अभिवचन देवूनदेखील पूर्वानुभवामुळे शालाव्यवस्थापनास त्यांवर विश्वास ठेवणे अशक्य असल्यासारखे दिसते.

    सर्वश्री अॅस्पीजी, सर्वश्री जनक द्वारकादासजी आणि सर्वश्री नवरोजजी सिरवाई ह्यांसारखे नामांकित आणि मुत्सद्दी न्यायशास्त्राभ्यासक पुढील बाजूने लढत असतानादेखील आदिश्रीचे पालक माघार घेत नाहीत, ह्याचाच अर्थ तेदेखील बडी पार्टी - हम भी कुछ कम नही - आहेत. २१ तकरारी १२ खटले भरून शालाव्यवस्थापनास जेरीस आणणारी ही मंडळी काय उद्देशाने हे सारे करते आहे हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. (प्रथमदर्शनी दिसणारा उद्देश खराच असावा ह्यास न्यायालयाची मान्यता नाही!) बातमीवरून ही मंडळी अरेरावी वाटतात.

    शालाव्यवस्थापनासंदर्भातील नियमांअनुसार शासकीय अनुदाने मिळत नसल्यास शालेय शिक्षणाचे फी ठरवणे हे शालाव्यवस्थापनाच्या अखत्यारीत येते. आपणांस ते भरणे शक्य नसल्यास आपण आपणांस परवडणार्‍या दुसर्‍या शाळेमध्ये प्रवेश घेवू शकता - नव्हे, तसा व्यक्तिस्वातंत्र्याधिकार आपणांस प्राप्त आहे. परंतु आपणास हवी त्याच शाळेच्या व्यवस्थापनावर अशा प्रकारे आपण डरावून-धमकावून आपलेच म्हणणे खरे करून घेवू शकत नाही. स्वातंत्र्याधिकार हा केवळ व्यक्तीची मक्तेदारी नव्हे - संस्थेससुद्धा स्वातंत्र्याधिकार तितकाच लागू होतो.

    मनसेला हाताशी धरले नसते, तर हा प्रश्न कदाचित वेगळ्याप्रकारे सुटला गेला असता.

    हैयो हैयैयो!
  • Paresh Chavan  - Admission of Adishri Gopalkrishnan
    This school is besically on Government Land. When Government providing Land for Social purpose how the private schools take the fees which are not affordable to the common man. I am not getting why this ICSC, CBSC sylabus are different than SSC Board. Can local board student compete with this ICSC/CBSC students? think on it? Why their is no limitation for fees ? The basics are still like past that Doctor son will be Doctor only money can provide future to our child. But any way there will be no change because we are not changing ourself.
  • Savita Lokhande  - Modern Guru-Kul of India
    What the modern schools are trying to teach to rest of the students? If someone is fighting in Legal Way against the injustice of powerful people or organization then that poor person will suffer like anything...Is this the teaching of modern costly schools? ... “Not to raise the voice against injustice....” “ Do our Indian morals allows “Such Teachings” by schools to students?
  • Rajan Sawant  - School fees - how much should we pay ?
    It is very sad to see the fees of a private school is suddenly increased exorbitantly. Where is the government ? I think it a crime on the part of the parents who fought the fee hike as per the relevant court order. If the school have enough money to hire leading legal heads to defend its illegal fee hike, then where is the justice ?
    Think.......
  • Vaibhav  - Shikshan Denare Mandir ki Paisa Kamavnari Corporat
    Jar koni Shale virudha aavaj uthavala tar ase honar aasel tar Palkani karache kay ? Vishesh Manaje Mananiy Nayalal pan ase nikal kase Dete.
    Apalya mulalache nuksan honar ya bhitine aapan gap rahayche. Ya goshtit Maharashtra Sarkar bagyachi bhumika ghenar ka ? Shala chalu karte veli Vidhya danache kam kele janar manun vividha soi padarat padun nantar vidhyarathanach chalayche.
    Vaibhav
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.