|
|
|
‘वर्षां’वर मुख्यमंत्र्यांनी घेतले सत्यसाईबाबांचे आशीर्वाद
|
|
|
|
|
मुंबई, १ नोव्हेंबर / खास प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला मलबार हिल वरील वर्षां बंगला आज सत्यसाईबाबांच्या व्हीव्हीआयपी भक्तांनी भारून गेला होता. सत्यसाईबाबांची स्तुतीपर भजने आणि प्रार्थना झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह व्हीव्हीआयपी भक्तांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. सत्यसाईबाबा पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या दर्शन-प्रवचनाचा कार्यक्रम वरळीच्या जांबोरी मैदानावर झाला तर आज ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावर होते.
आपल्या जन्मापासून ते आपले अध्यात्मिक गुरु असल्याचे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे वडील राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण हे ही बाबांचे निस्सीम भक्त होते. खास सत्यसाईबाबांच्या दर्शनाला आलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारीही होते.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|