मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> संमेलनाला ठाणेकर सहकार्य करतीलच
 


स्पर्धेचे नियम व अटी




संमेलनाला ठाणेकर सहकार्य करतीलच Bookmark and Share Print E-mail
मधु मंगेश  कर्णिक यांचा विश्वास
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे हे श्रीस्थानक म्हणून ओळखले जात असल्याने सरस्वतीबरोबरच संस्कृतीही येथे नांदते. तेव्हा या तीन गोष्टींना अनुरूप असे साहित्य संमेलन ठाण्यात व्हावे. साहित्यावर, कलाजगतावर प्रेम करण्याची शहराची संस्कृती आहे. या संस्कृतीला अनुसरून सुजाण ठाणेकर संमेलनाला सहकार्य करतीलच, असा आशावाद माजी संमेलनाध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आनंद विश्व गुरुकुल आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. प्रदीप ढवळ लिखित ‘शिवबा’ या पुस्तकाचे प्रकाशन कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. दाऊद दळवी, वि.ह. भूमकर, शिवसेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, कवी अशोक बागवे, शारदा प्रकाशनचे संतोष राणे आदी उपस्थित होते. शिवकालीन वातावरणात भालदार-चोपदार आणि बालशिवबाच्या उपस्थितीत पार पडलेला हा पुस्तक प्रकाशन सोहळा वाखाणण्याजोगा होता. सर्वच मान्यवरांनी लेखक प्रा. ढवळ यांच्या ‘शिवबा’ या शिवकालीन आणि शिवकाळापूर्वीच्या कथानकाची मुक्तकंठाने स्तुती केली. जे ‘जाणता राजा’मध्ये नाही ते या ‘शिवबा’मध्ये आहे, अशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या स्तुती सुमनाची आठवण अनेकांनी जागवली. यावेळी कर्णिक यांनी ‘इतिहास हा माझा विषय नसल्याने या पुस्तकावर बोलणे अधिकार्य होणार नाही’, अशी कबुली देत शिवरायांचे स्मरण करणे एवढेच आता हाती राहिले असून, अनेक क्षेत्रात महाराष्ट्र रसातळाला जात आहे, अशी खंतही व्यक्त केली.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना कर्णिक यांनी ठाण्यात होणाऱ्या ८४ व्या साहित्य संमेलनाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली, तर यापूर्वी पार पडलेल्या साहित्य संमेलनात काही जणांकडून अशोभनीय वर्तन घडल्याचे सांगून ती त्यांची ‘संस्कृती’ होती, अशी मल्लिनाथीही कर्णिक यांनी केली.    
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.