03 June 2020

News Flash

‘निसर्ग’ संकट टळले!

‘निसर्ग’ संकट टळले!

अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी अलिबागजवळ धडक दिली. मुंबई आणि ठाण्याला वादळाचा तडाखा वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कमी बसला. मात्र, रायगड जिल्ह्य़ात मोठे नुकसान झाले. अलिबाग तालुक्यात वीजेचा खांब कोसळल्याने एकाचा, तर श्रीवर्धन तालुक्यात वृक्ष पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशच्या दिशेने सरकणाऱ्या वादळाची तीव्रता कमी झाली असून त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्टय़ात रुपांतर झाले. अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्री वादळ दुपारी साधारण साडेबाराच्या सुमारास आलिबागजवळ धडकले. ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहात होते. साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास वादळाने किनारा ओलांडून राज्यात प्रवेश केला. त्यानंतर मात्र पुढील सहा तासांमध्ये त्याची तीव्रता खूप कमी झाली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 उच्चशिक्षणमंत्री हवेत कशाला?

उच्चशिक्षणमंत्री हवेत कशाला?

आदित्य ठाकरे, रोहित पवार अशांच्या मागणीवरून इतका मोठा निर्णय घेतला जाणार असेल तर हा शिक्षणाचा ‘पोर’खेळ झाला

लेख

अन्य

Just Now!
X